श्रीपती शुगर अँण्ड पॉवर डफळापूर कारखान्याचा गळीत हंगामाचा बुधवारी शुभारंभ

0
5
डफळापूर : श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि. डफळापूर या साखर कारखाण्याचा पहीला गळीत हंगाम शुभारंभ बुधवार दि.१८ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.

 

भारती विद्यापीठ पुणेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांचे शुभहस्ते तर पतंगराव कदम सोनहीरा सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आ.वनश्री मोहनराव श्रीपतराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व माजी सहकार राज्यमंत्री तथा चेअरमन आ.डॉ.विश्वजीत पतंगराव कदम,भारतीचे विद्यापीठचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम,जतचे आमदार तथा कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह बाळासाहेब सावंत,सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंग फत्तेसिंग नाईक,डॉ. पतंगराव कदम सोनहीरा सह. साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ श्रीपतराव कदम,श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि. डफळापूरचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा बँक संचालक महेंद्र सुबराव लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक १८ जानेवारी २०१३ रोजी सकाळी १०.१५ वाजता संपन्न होणार आहे.

 

जत,कवटेमहाकांळ सह कर्नाटकातील सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कारखान्यामुळे मोठा फायदा होणार आहे.या कार्यक्रमाचा परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कंत्राटदार,ठेकेदार, कर्मचारी, व्यापारी व हितचिंतक यांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे,असे आवाहन जनरल मँनेजर महेश पांडूरंग जोशी,डफळापूरचे सरपंच सुभाषराव रावसाहेब गायकवाड,कुडणूरच्या सरपंच सौ.शालन बाबासो सरगर यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here