पर्यावरण पुरक हळदी-कुंकू कार्यक्रम | विधवा महिला बचत गटाला धनादेशाचे वाटप

0
5
सांगली :, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत संक्रांती निमित्त पर्यावरण पूरक हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.  महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मां जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करीत वंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेने स्थापन केलेल्या पहिल्या विधवा महिला बचत गटाला कॅनरा बँकेच्या माध्यमातून 1 लाखाचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्ती मोहीम अंतर्गत नवी चेतना : पहल बदल की पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले तर  राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जनजागृती शपथही घेण्यात आली. या कार्यक्रमास महापालिकेच्या गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त स्मृती पाटील, मनपाच्या समाजकल्याण सभापती अनिता व्हनखंडे, माहेर रुग्णालयाच्या डॉ. आशा गाझी, सामाजिक कार्यकर्ता अर्चना मुळे, नगरसेविका वहिदा नायकवडी, वर्षा निंबाळकर, लक्ष्मी सरगर, सोनाली सागरे , उर्मिला बेलवलकर आदी उपस्थित होते. यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत हळदी कुंकूसाठी वान म्हणून पर्यावरण पूरक कापडी पिशव्या देत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याचा संदेश देण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाकडून या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला मानसोपचार तज्ञ अर्चना मुळे, टाटा इन्स्टिट्यूटच्या समन्वयक कविता निकम, डॉ आशा गाझी यानी सर्व महिलांना मार्गदर्शन केले तर वित्तीय साक्षरताबाबत एलआयसीचे सहायक व्यवस्थापक निखिल बाम आणि प्रतिनिधी सुरेश सारडा यानी एलआयसी योजनांची माहिती देत बचतीचे महत्त्व सांगितले.  अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे यांनी सूत्रसंचालन तर समुव्ह संघटीका वंदना सव्वाखंडे, शाहीन शेख, संपदा मोरे, व्यवस्थापक रोहिता कांबळे, अल्फिया मुलाणी, स्वच्छ सर्व्हेक्षण
विभागाच्या शहर समनवयक अधिकारी वर्षा चव्हाण , वैष्णवी कुंभार, स्नेहलता वर्धमाने
यानी संयोजन केले.
या कार्यक्रमास महापालिका कार्यालयातील विविध विभागातील महिला कर्मचारी, भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या समुपदेशक, महिला स्वच्छता निरीक्षक आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात ओल्या कचऱ्यापासून प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या खताची माहिती उपायुक्त स्मृती पाटील आणि स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे आणि वर्षारानी चव्हाण यांनी सर्वांना दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here