‘व्हाईस ऑफ मिडीया’ च्यावतीने पॉझीटीव्ह जर्नालिझम ॲवार्ड | सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन : राज्यस्तरीय स्पर्धा,अडीच लाखांचे पुरस्कार 

0
2
सांगली : ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड सुरू केला आहे. या स्पर्धेत रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी स्पर्धक पत्रकारांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन मोहते,जत तालुकाध्यक्ष राजू माळी यांनी दिली.
मोहिते,माळी म्हणाले, सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. ही संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. संघटनचे  राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा, यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३ ची घोषणा केली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे. य्प्रथम क्रमांक १ लाख रुपये रोख, द्वितीय क्रमांक ६१ हजार रुपये रोख, महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख व तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये रोख पुरस्कार तसेच सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सहभागींना उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार व सर्व सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  स्पर्धेत सहभागी होणारे पत्रकारांनी प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाऱ्या बातम्या, लेख यास्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.  ही स्पर्धा महाराष्ट्र, मराठी भाषेपुरतीच आहे. शेट ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान चिखलीचे अध्यक्ष आशीष ब्रिजमोहन लढ्ढा यांच्या सहकार्याने हा पुरस्कार उपक्रम पार पडतोय. या स्पर्धेत राज्यातील जिल्ह्यातील सर्व पत्रकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिन मोहिते,राजू माळी यांनी केले आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here