सांगली जिल्ह्यासाठी ४७२ कोटीचा आराखडा सादर

0

सांगली : जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 साठी जिल्ह्याचा 472.66 कोटीचा आराखडा आज राज्यस्तरीय बैठकीत कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सादर केला.  या आराखड्यात 140 कोटी 84 लाखाच्या  अतिरीक्त मागणीचा समावेश आहे. जिल्ह्याने सादर केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यास निधी मिळावाअशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली. जिल्ह्याच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी निधी उपलब्ध करुन दिला जाईलअसे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.

 

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-2024 राज्यस्तर बैठक उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेआमदार सुधीर गाडगीळजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडीपोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीजिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

 

राज्यस्तरीय बैठकीत सादर केलेल्या आराखड्यात गाभाक्षेत्रासाठी 186 कोटी 15 लाख 27 हजार  लाखबिगर गाभा क्षेत्रासाठी 93 कोटी 7 लाख 63 हजारनाविण्यपूर्ण व मूल्यमापनसाठी 16 कोटी 59 लाख 10 हजारमुख्यमंत्री ग्रमा सडक योजनेसाठी 36 कोटी अशी 331 कोटी 82 लाखाची  तरतूद करण्यात आली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.