वळसंग,संकेत टाइम्स : गोंधळेवाडी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य मिलिंद टोणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले.तत्पुर्वी १०० टू व्हिलर आणि ७० हुन अधिक फोर व्हिलरच्या रॅली समवेत शक्तिप्रदर्शन करत मनसेतून टोणेसह अनेक युवा नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी टोणे यांची जत युवासेना तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी टोणे म्हणाले की, जत तालुक्यातील युवक नेतृत्व म्हणून संपर्कप्रमुख योगेश जानकर आणि युवा सेना तालुका प्रमुख प्रविण अवराधी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवून,या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवू,अशी ग्वाही यावेळी टोणे यांनी दिली.
प्रवेश घेतलेल्या नूतन सदस्यासह युवा नेते,कार्यकर्त्यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जत तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
गोधळेवाडीचे ग्रा.पं.सदस्य तथा मनसेचे युवा नेते मिलिंद टोणेसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला.