महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र विस्तारत असून अनेक नवयुवक शेतीकडे वळले आहेत.त्यामुळे जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे.परिणामी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे आता ठिंबक सिंचन हा सर्वोत्तम उपाय शेतकऱ्यासमोर आहे.आहे त्या पाण्यात थेट रोपाच्या बुडात पाणी सोडून उत्पादक वाढविणे शक्य होत आहे.पिकांच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत यालाच ठिबक सिंचन असे म्हणतात.आता या पध्दतीचा वापर गरजेचा ठरत आहे.कारण दंडाने पाणी देण्यासाठी तेतके पाणी उपलब्ध होत नाही.परिणामी कमी वेगाने पिकास पाणी देऊन ते नेमक्या पिकाच्या ठिकाणी मुरविण्यासाठी ठिंबक सिंचन पध्दत फलदायी ठरत आहे.ठिबक सिंचन वापरात महाराष्ट्र अग्रेसर असून देशाचा विचार केला तर जवळपास ६० टक्के ठिबक सिंचन नसत्या महाराष्ट्रात वापरले जाते आहे.
ठिंबक सिंचनाबरोबर आणखीन एक पध्दत सध्या शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध आहे.तुषार सिंचन ( मोठ्या व्यासात पाणी शिंपडून पिकांना पाणी देता येते)ही एक पध्दत अशी आहे की जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरण्यात येते.या तुषार सिंचनाचा वापर पिकांचा स्तर थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील होतो.
तुषार सिंचन ही पावसा सारखी आहे.त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवून पिकांना लागेल तेवढे पाणी देणे शक्य आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह, पाईप्स आणि स्प्रिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक शेतकरीही यांचा आता वापर करू लागले आहेत. जेव्हा पंपाच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.त्यामुळे नोझलच्या सेट व्यासानुसार चारही बाजूना पाणी पावसाप्रमाणे वरून शिंपडले जाते.त्यामुळे पाणी बचत,योग्य पाणी देणे शक्य आहे.
हेही वाचा-फक्त हजार पासून पंचवीस हजार रूपये भांडवलात सुरू होणारे व्यवसाय | आजच सुरू करा स्व:चाचा व्यवसाय
या ठिंबक व तुषार सिंचनासाठी शासन पोत्साहन देत आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन अनुदान देत आहेत.फक्त व्यवस्थित प्रस्ताव शासनास सादर करण्याची गरज आहे.शेती क्षेत्राला पाणी बचतीतून उत्पन्न वाढविण्याचा व शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा शासनाचा उद्देश्य आहे.आपल्या स्थानिक कृषी कार्यालयात किंवा आपल्या भागातील कृषी सहाय्यकांना याबाबत माहिती विचारावी..
अशी आहे अनुदान योजना
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठिंबक सिंचनाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान असे असेल
1) अल्प,अत्यल्प भूधारक शेतकरी : 55 %
2) इतर शेतकरी – 45 %
या आहेत पात्रता
– जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
– शेतकऱ्याकडे स्व:ताचे आधार कार्ड असावे.
-शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
– शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
– शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
– सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
– शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
– शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
ही कागदपत्रे आवश्यक
¶ ७/१२ उतारा (जो नवीन असावा)
¶ ८-अ उतारा(जो नवीन असावा)
¶ वीज बिल(आपल्या मोटारीचे)
¶ खरेदी केलेल्या संचाचे बिल(दुकानदाराकडून घ्यावे)
¶ आपली पूर्वसंमती पत्र आवश्यक
माहिती स्ञोत – mahadbt.maharashtra.gov.in