आधारकार्डला-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत वाढविली आहे.जर वापरकर्त्याने ही कार्ड लिंक केले नाहीत, तर त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.एका रिपोर्ट्सनुसार,भारतात सुमारे 13 कोटी लोकांनी अजूनपर्यत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसल्याचे समोर आले आहे.
एवढी मोठी संख्या असल्याने आयकर विभागाने यासंदर्भात मुदत वाढीसह नवीन आदेश जारी केला आहे.आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर हे 3 नुकसान होऊ शकतात.अशाच 3 गैरसोयींबद्दल आम्ही माहिती देत आहोत.
पॅन कार्ड निष्क्रिय जर तुमचे पॅन कार्ड आयकर विभागाने निष्क्रिय असेल तर तुम्ही 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करू शकणार नाही.त्याशिवाय बँक किंवा अन्य महत्वाच्या कामासाठी पँनकार्डची गरज भासणार आहे.
म्युच्युअल आणि इतर आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी देखील पॅन क्रमांक आवश्यक आहे. जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर अनेक नुकसान होऊ शकते.त्याशिवाय आता अड्रेस पुरावा म्हणूनही पँनकार्ड ग्राह्य धरले जाणार असल्याने तेथेही गैरसोयीचे ठरणार आहे.
त्याशिवाय बँकाच्या बचत बँक खात्यातून तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे व काढण्यासाठी पॅन क्रमांक लागत असल्याने तेथेही गैरसोय होणार आहे.पॅन कार्ड सक्रिय नसल्यास तुम्ही हे करू शकत नाही. तुम्हाला आयकर रिटर्न भरण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे.याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.