गेल्या दोन लाटेनंतर अजून जनता आता कुठेतरी सावरत असतानाचा देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांच्या सातत्याने वाढीची आकडेवारी नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार,मागील दोन आठवड्यात हा आकडा ३.५ टक्के वाढला
देशातील १४ राज्यातील ३२ जिल्ह्यातील एका आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.दोन आठवड्यांपूर्वी ५ राज्यातील ९ जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के इतका होता. देशातील १९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ६३ जिल्ह्यांत १९ ते २५ मार्चमध्ये टीपीआर हा ५ ते १० टक्के इतका होता. जो दोन आठवड्यांपूर्वी ८ राज्यांतील १५ जिल्ह्यांमध्ये होता. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचाही यात समावेश असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईत करोनाचे रुग्ण वाढले, यंत्रणांच्या हालचालींना वेग; ‘या’ दोन रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढवली
मागील वर्षी जानेवारी आणि मार्च दरम्यान भारतात करोना महामारीची तिसरी लाट आली होती. यावेळी करोना रुग्णांमध्ये लक्षणही सामान्य दिसत होते. तसंच, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी होते.सध्या दिल्लीत रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे.जास्त पॉझिटिव्ही रेट असलेले जिल्ह्यांच्या यादीत, केरळच्या वायनाडमध्ये १४.८ टक्के, कोट्टायममध्ये १०.५ टक्के, गुजरातच्या अहमदाबादमध्ये १०.७ यांचा समावेश आहे. तर, यामध्ये महाराष्ट्रातील सांगली १४.६ टक्के आणि पुणे ११.१ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंद केला आहे.

आताही करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आताही देशभरातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याकमी आहे. त्यामुळं करोनाची लक्षणे दिसताच दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं अवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे नॅशनल कोविड टास्क फोर्सचे चेअरमेन डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे.सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ, पेनकिलरसह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार
XBB.1.16 हा विषाणूचा एक नवीन प्रकार आहे.
जो BA.2.10.1 आणि BA 2.75 या उपप्रकारांच्या संयोगातून विकसित झाला आहे. आतापर्यंत 14-15 देशांमध्ये त्याची प्रकरणे आढळून आली आहेत. माजी ICMR शास्त्रज्ञ डॉ ललित कांत म्हणाले, भारतात आतापर्यंत नोंद झालेले रुग्णांची लक्षणे सौम्य आणि गंभीर नाहीत. रूग्णांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. मात्र, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
नविन लक्ष्मणे,नवीन व्हेरियंट
महाराष्ट्रात सोमवारी २०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन रुग्णांच्या नमुन्याची जीनोम सीक्वेंसिग केल्यानंतर XBB.1.16 हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे.हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, XBB .1.16 हा व्हेरियंट अल्फा, डेल्टा आणि ओमिक्रॉनसारखा घातक ठरु शकतो. हा व्हेरियंटचा फैलाव वेगाने होतो. मात्र, याची लक्षणे गंभीर नसल्याचं म्हटलं जातं.मात्र धोका कधीही बळावू शकत असल्याने यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.