महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे.पुरोगामी राज्यात बालविवाहाची प्रथा आजही सुरूच आहे.देशात व राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत.महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत पंधरा हजाराहुन अधिक बालविवाह झाल्याचे समोर आले आहे.
सांगलीत श्रीरामाच्या ५१ फुटी प्रतिमेचे दर्शन
त्याचबरोबर १८वर्षाखालील १५हजार २५३मुली ह्या माता बनल्याची माहीती समोर आली आहे.कोरोना कालखंडात अनेक बालविवाह झाली.बालविवाह हि अनिष्ठ प्रथा आहे .तरीही आज कायदयाचे उल्लंघन होताना दिसत आहे.बालविवाह प्रतिबंधक २००६अंतर्गत कायदा करूनही बालविवाह रोखण्यात आपण कमी पडलो आहे.
डॉक्टरांना १५ लाखांच्या खंडणीची मागणी,तिघाविरोधात गुन्हा दाखल
गेल्या तीन वर्षात केवळ दहा टक्के बालविवाह रोखण्यात सरकारला यश आले आहे.सरकारने अधिक व्यापक पावले उचलण्याची गरज आहे.मुलाचे वय २१वर्ष तर मुलीचे वय १८वर्ष पेक्षा कमी असु नये.बालविवाह करणार्यांना दोन वर्ष कैद,तर दंडाची शिक्षा ठोठावली जाते.एवढी शिक्षा असूनही बालविवाह होत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे.
आपण एकीकडे महीला सक्षमीकरणाच्या योजना केल्या.तर दुसरीकडे बालविवाहाची प्रथा सुरू आहे.बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते.अल्पवयीन गर्भधारणा , उपासमारी, बालमृत्यूचे समस्येला सामोरे जावे लागते आहे.महाराष्ट्रात दर पाच मुलींमागे एकीचा बालविवाह होतो आहे.बालविवाहाची प्रथा थांबवण्यासाठी सरकारने अथक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५