खानापूर : अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने केबल वाहिनीच्या कामावरील दोघे कामगार ठार झाले. नागेश लक्ष्मण जाधव (वय ३८, रा. रामपूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर) व अनिल रामू चव्हाण (१८, रा. केरुरगी, ता. सिंदगी, जि. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत.खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ तासगाव रस्त्यावर घटना घडली आहे.याप्रकरणी मुकादम जयसिंग धनसिंग राठोड यांनी पोलिसात अपघाताची फिर्याद दिली आहे.
हेही वाचा –अनैतिक प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा खून | संशयित मातेसह प्रियकर ताब्यात
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता काम संपवून अपघातग्रस्त कामगार रस्त्याच्या बाजूला बोलत उभे होते.अपघातग्रस्त कामगार ‘बीएसएनएल’च्या केबल वाहिनीचे काम करण्यासाठी करंजे येथे आले होते. भिवघाट ते करंजे रस्त्याच्या कडेला भिवघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीशेजारी हे काम सुरू होते.
हेही वाचा –कर्नाटक निवडणूक : कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त; 2890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, 88 लाखांची रोकड, 11 अग्निशस्त्रे जप्त
यावेळी तासगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने नागेश जाधव व अनिल चव्हाणला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण चिरडले गेले. दोघांच्या डोक्यास गंभीर मार लागला. नागेश जाधव जागीच ठार झाला, तर अनिल चव्हाणला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा –६ संशयित,७ पिस्तूलेसह १७ जिवंत काडतुसे जप्त,पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन
अज्ञात वाहन अपघातस्थळी न थांबता वेगात निघून गेले. यावेळी तेथे उपस्थित असेलेले जयसिंग राठोड ओरडल्यामुळे घटनास्थळी कंपनीचे अभियंते व काही लोक आले. त्यांनी अज्ञात वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन सापडले नाही. पोलीस उपनिरीक्षक टी. डी. नागराळेपुढील तपास करीत आहेत.