सांगली : सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व गतीने होईल. तसेच या पुलामुळे नागरिकांच्या जाण्या-येण्याची अडचण दूर झाली असल्याचे मत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.
कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. कार्यक्रमास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, रेल्वे प्रशासनाचे उपमुख्य अभियंता सागर चौधरी, कार्यकारी अभियंता शंभू चौधरी, पृथ्वीराज पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी त्यांना धन्यवाद दिले व आजपासून हा रेल्वे पूल वाहतूकीसाठी खुला झाल्याचे जाहीर केले.