प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वेगळाच राडा

0
Rate Card
प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात‌ तूफान गर्दी,प्रेक्षकांच्या अति उत्साहामुळे राडा निश्चित असतो. पंरतू, आता गौतमीच्या कार्यक्रमातील एक वेगळाच व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावातील आहे.

गौतमीने महिलांचा उत्साह बघून स्टेजवरून खाली उतरत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला, मुलींसोबत ठेका धरल्याने उत्साहाला उधान आले.गौतमीचा कार्यक्रम फक्त पुरूषासाठी असतो, ही ओळख आता पुसू पाहत असून महिलांही गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी करत असल्याचे चित्र आहे. संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सास्कृतिक मोहोत्सव निमित्ताने गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेहमी स्टेजवर आपल्या घायाळ आदांनी हातवारे करत डान्सने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीने यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री करत ठेका धरला.

View this post on Instagram

A post shared by gautami_patil (@gautami_oficiall)

यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्गाला देखील गौतमीचा डान्साचा आनंद घेता आला.कार्यक्रमात गौतमीने फिल्मी अंदाजात एंट्रीने उपस्थित महिलांच्यात उत्साह दिसून आला.सर्वांनी ठेका घरला.विशेष म्हणजे इतक्या उत्साहानंतरही गौतमीचा हा कार्यक्रम कोणातही राडा न होता निर्विघ्नपणे पार पडला.महिलांनी ठेका धरलेल्या या कार्यक्रमाची मात्र राज्यभर चर्चा रंगली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.