जत : जत-विजापूर महामार्गावर एसटी बसला मालवाहतूक ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने एसटीतील २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.जखमीपैंकी एकाची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहेत.सायकांळी सहा वाजण्याच्या दरम्यान घटना घडली आहे.पोलीस व स्थानिकांनी तातडीने जखमींना जत व विजापूर रुग्णालयात हलविले आहे.
अधिक माहिती अशी,महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस प्रवासी घेऊन सांगोला जतमार्गे विजापूरकडे जात होती.मुंचडीपासून दोन किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र कर्नाटक सिमेजवळ बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असता,पाठीमागून भरधाव गतीने येत असलेल्या मालवाहतूक ट्रकने एसटीला पाठीमागून धडक दिली.यात एसटीतील तब्बल २२ प्रवासी गंभीर जखमी झाले.पाठीमागून जोराची धडक बसल्याने अनेक शीट दबल्याने प्रवासी अडकून राहिले होते.जवळच्या स्थानिक नागरिकांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत.जखमीपैंकी एकाची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.पोलीसांनी कारवाई सुरू केली असून रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.