सांगली : जिल्ह्याच्या जत तालुक्यातील बिळूरसह आठ गावांत म्हैसाळ सिंचन योजनेचे काम रखडले आहे. हे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी या गावातील ग्रामस्थांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते.आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली व प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.येत्या पाच ते सहा दिवसात या गावातील काम पूर्ववत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. मला आशा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासन लवकरात लवकर या गावांमध्ये योजनेचे काम पूर्ववत करतील व या भागातील ग्रामस्थांना दिलासा देतील,असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.