शेतकऱ्यांसाठी आंनददायी बातमी | आता ट्रॉलीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

0
4
कोल्हापूर : राज्यासह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून यंदा शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला ‌फायदा होणार आहे.
यामुळे यांत्रिकीकरणाला गती मिळेल, असे चित्र आहे. मात्र, लॉटरी उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. दरम्यान, जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेत १८६० लाभार्थी निधीअभावी अनुदानासाठी प्रलंबित आहेत. या शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी होत आहे.

राज्यभरात राज्य शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. मजुरांची कमतरता व अपुरे मनुष्यबळ यामुळे आता शेतात यंत्राची आवश्यकता आहे. म्हणून कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अद्ययावत यंत्रणा अवजारांचा अनुदानावर पुरवठा होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना आहे.

यंत्रे अवजारासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. यासाठी वैयक्तिक शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थाही अर्ज करू शकतात.
दरम्यान, यावर्षीपासून सर्वसाधारण गटासाठी ट्रॉलीला ४५ टक्के अनुदान, तर अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळेल, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा.

 

 

विविध गट अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here