कवटेमहाकांळ : राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नुतन माळी, सचिव डॉ.रामलिंग माळी, यांच्याकडून डॉ.अमोल पाटील यांची राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ.रामलिंग माळी यांनी डॉ.अमोल पाटील यांचे अभिनंदन केले. फळाची अपेक्षा न करता केलेल्या प्रामाणिक कष्टाची ही पोचपावती असल्याचे सांगितले.नुतन माळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले तसेच मला विश्वास आहे की तुम्ही तुमची दृष्टी, अनुभव आणि कौशल्य निःसंशयपणे या संस्थेला यशाच्या नवीन शिखरावर नेण्यास मदत करेल तुम्ही असेच उत्कटतेने आणि उत्कृष्टतेने प्रेरणा देत रहा आणि नेतृत्व करत राहा असे सांगण्यात आले.
डॉ.बाजीराव शिंदे डॉ.रामलिंग पत्रकर,भैरू माळी, डॉ.शर्मिला पाटील, तात्यासो माने, प्रवीण कुमार लादे, यांनी मार्गदर्शन केले,प्रा.मयूर सोनार यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.नुतन माळी, सचिव डॉ.रामलिंग माळी,अरुण आप्पा भोसले तसेच राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमोल पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.