घोडावतच्या २२५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

0
2
जयसिंगपूर:शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, एमबीए, एमएस्सी, व  फार्मसी शाखेतून यावर्षी २२५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधून विद्यापीठाच्या २२५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. यामध्ये फेडरल बँकने सर्वात जास्त म्हणजे १० लाखाचे  पॅकेज विद्यार्थ्याला दिले आहे.ही निवड म्हणजे संस्थेच्या यशस्वी वाटचालीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांना नैसर्गिक कलचाचणी, समूह चर्चा, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, कल व दृष्टीकोन चाचणी, वैयक्तिक मुलाखतीची रंगीत तालीम इ.बाबत प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळविण्याच्या दृष्टीकोनातून या विभागामार्फत तयारी करून घेतली जाते. तसेच शिक्षण व उद्योग क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना समुपदेशन पर मार्गदर्शन शिबिरे व कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
विद्यापीठाने प्रामुख्याने अभियांत्रिकीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ,टेक महिंद्रा, एक्सेंचर, कॅपजेमिनी, पारी रोबोटिक्स, इन्फोसिस ,पर्सिस्टन्ट, विप्रो , कॉग्निझंट, अटॉस सिन्टेल, हेक्सावेअर, फयूरेशिया , सेंटेलोन सोल्युशन्स, हिडन ब्रेन्स, कॉग्निशन , हायटेक सोल्युशन्स, प्रिझम जॉन्सन, जेडब्ल्यू कन्सल्टंट तर एमबीए साठी बर्जर पेन्ट्स, एशियन पेन्ट्स, एरटेल, फेडरल बँक,आयडीबीआय बँक, एच एफ एफ सी, एचडीएफसी बँक, एच सी एल स्टेट स्ट्रीट, आदित्य बिर्ला ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, एन जे ग्रुप,डी मार्ट, वोडाफोन आयडिया, तसेच स्कूल ऑफ सायन्स अँड फार्मसी साठी टीसीएस सिग्मा,सिपला मेडी स्प्रे,लुपिन बायोटेक, कॅलिडस लब्स, लक्साई लाइफ, रुबिकॉन, फ्लुरो केम, एन क्यूब इथिकल्स , संजय घोडावत ग्रुप या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे.
यासाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.स्वप्निल हिरीकुडे, इंडस्ट्री रिलेशन संचालक एन व्ही पुजारी व सर्व विभागाचे समन्वयक यांनी परिश्रम घेतले.या निवडीबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,  कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी, रिसर्च डीन डॉ.ए.डी. सावंत यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here