डोळ्यांबाबत काळजी घ्यावी !

0
6
सध्या संपूर्ण राज्यात व जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये डोळे येण्याची साथ वाढलेली दिसुन येत आहे.त्यामुळे प्रत्येकाने स्वता:ची व इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.सध्या रुग्णालयांमध्ये डोळे येणार्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.विशेषता:हा शाळेतील लहान मुलांमध्ये डोळे येण्याची साथ वाढीस लागली आहे.त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
डोळे हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे.बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात डोळ्यांची साथ येते.त्यामुळे घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही.शहरी ग्रामीण भागातील नागरीक, विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.ॲडिनो विषाणु मुळे डोळे येतात.डोळ्यांना चिपड येणे डोळे कचकच करणे , डोळ्यांतुन चिकट पाणी वाहणे,डोळ्यांची आग होणे,खाज सुटणे,सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात.
डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आलेल्या समोरील व्यक्तीचेही डोळे येतात.सध्या डोळ्यांच्या साथीबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.डोळे चोळल्यास ते लाल होतात.व डोळ्यांना सुज येते.एक डोळा आला की दुसराही डोळा येतो.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.डोळ्यांच्या साथीचे रूग्ण असणार्यांनी कोणत्याही वस्तूला हात लावू नये.शक्यतो गर्दीत जाणे टाळावे.वेळोवेळी हाताची स्वच्छता राखावी.डोळ्यांना चष्मा लावावा.
नेत्रतज्ञ्यांच्या सल्ल्याने औषधे वेळच्या वेळी घ्यावी.कुटुंबातील एकाचे डोळे आले की कुटुंबातील सर्वांनाच डोळे येण्याची शक्यता असते.सध्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या   साथीचे प्रमाण दिसुन येत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.डोळ्यांची जळजळ होत असल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत.डाॅक्टरांनी दिलेली औषधे घ्यावी.चष्मा वापरावा.हवेमुळे डोळ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
डोळे आलेल्यांचे टाॅवेल , रुमाल एकमेकांनी वापरू नये.शक्यतो प्रवास करणे टाळा.शाळेतील विद्यार्थ्यांनी डोळे आल्यास घरीच राहावे.डोळे आले म्हणजे घाबरून न जाता इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.घरीच घरगुती उपाय करू नयेत.वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.व औषधौपचार करावेत.डोळे चार ते पाच दिवसांत बरे होतात.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही परंतु डोळ्यांबाबत प्रत्येकाने काळजी घेतली तर डोळ्यांच्या साथीला नक्कीच  आळा बसु शकतो.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here