जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यातील सनमडी सोसायटी बँक पातळीवर व सभासद पातळीवर १०० टक्के वसुली तर वाज्रवाड, बसर्गी, रवळगुंडवाडी,दरिकुणुर,सोर्डी,आसंगी जत, उटगी,शिंगणापूर इ.13 सोसायटी बँक पातळीवर 100 टक्के वसुली झाली म्हणून त्या संस्थाचे चेअरमन,व्हा. चेअरमन,सचिव,फिल्ड ऑफिसर यांचा माजी आमदार विलासराव जगताप यांचेहस्ते सन्मान केला.