जत : राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार कोणत्याही उपायोजना राबवण्यास तयार नाही. सत्तेच्या सारीपाटात सर्वसामान्यांचे हाल होत आहे. हे विदारक चित्र थांबवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचाराची गरज आहे. पवार साहेबांनी दिलेली माझ्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी निश्चित पणे पेलीन, वंचित शोषित कष्टकरी सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर अधिकाधिक भर राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस शिवाजीराव खांडेकर यांनी केले.
येळवी (ता.जत) येथे त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राज्याच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आरतीताई अंकलगी उपस्थित होत्या, जेष्ठ नेते पंचाक्षरी अंकलगी, सचिन माने पाटील निवृत्त मुख्याध्यापक सदाशिव पूकळे , मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे, इतिहास संशोधक प्रकाश गुदळे , श्रीकृष्ण प्रकाश गुरुकुल विद्यापीठचे संस्थापक ज्ञानेश्वर आवटे, मुख्याध्यापक सुनील साळे, नवज्योत ऍग्रोटेक चे लिंबाजी सोलनकर, ॲड. सागर व्हनमाने , डॉ. विवेकानंद स्वामी, दीपक अंकलगी , ॲड.सचिन व्हनमाने ,दत्तात्रय साळे , मुख्याध्यापक आनंदा क्षीरसागर ,मुख्याध्यापक भारत क्षीरसागर, जिल्हा शिक्षण सेवक पतसंस्थेचे माजी चेअरमन संदीप पाटील, सुरेश लवटे, शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष खोत शैक्षणिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खांडेकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले , आजवर शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली, अजूनही शिक्षण क्षेत्रातील प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत, 2005 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नाहीत, शिक्षकांची 2012 पासून पदे रिक्त आहेत परिणामी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे शासनाच्या समोर ही वस्तुस्थिती वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे, परंतु या सर्व प्रश्नासाठी शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देणार आहे.
येळविकारांनी भूमिपुत्राचे जल्लोषत स्वागत
शिक्षण क्षेत्रातील दोन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रभर काम करत असताना विविध पदाच्या माध्यमातून शिवाजीराव खांडेकर यांनी न्याय दिला आहे,माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाच्या जनरल सेक्रेटरी ते राष्ट्रवादी पक्षाच्या राज्याच्या सरचिटणीस पदापर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे, अत्यंत अभ्यासवृत्ती परखडपणाने अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, नुकतेच त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे त्यांना याबाबतचे नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहे, गावच्या सुपुत्राची शिक्षण क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात मारलेली मजल यामुळे येळविकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला, खांडेकर कार्यक्रम स्थळ येताच फटाके वाजवून ढोल ताशाच्या गजरात हार तुरे स्वागत केले. भव्य नागरी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.