किरकोळ कारणावरून कंठीमधील एकावर कोयत्याने हल्ला

0
31



जत,संकेत टाइम्स : मयत झाल्यानंतर कोंबडी कापून पार्टी का खाललीस म्हणून प्रकाश राजाराम मोटे वय 34 रा.कंठी यांना भावकीतील तिंघानी काठी,गजाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रावसाहेब भिवा मोटे, अमोल संभाजी मोटे,नागेश श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.






अधिक माहिती अशी,फिर्यादी प्रकाश राजाराम मोटे यांच्याशी जून्या वादाचा राग मनात धरून आमच्या भावकीतील नाना मोटे मयत झाल्यानंतर कोंबडे कापून पार्टी करून खाललीस म्हणून संशयितांनी वाईट वगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून लोंखडी गज‌ व काठ्याने मारहाण करून हाताला गंभीर दुखापत करून पाठ,छातीवर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी भादवि 326,323,324,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here