जत तालुक्यात शुक्रवारी 58 रुग्णाची नोंद,एकाचा मुत्यू
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना बाधित आकडा शुक्रवारी 58 नोंद झाला आहे.तालुक्यातील चिंता अजूनही कायम आहे.त्यातच आजपासून जिल्ह्यात सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. एकदम नागरिकांची गर्दी उसळल्यास पुन्हा बाधित आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
तालुक्यात आज एक जणाचा मुत्यू झाला.82 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात 895 जण सध्या उपचाराखाली आहेत.
जत 7,बिरनाळ 3,रामपूर 1,निगडी खु.3,पाच्छापूर 2,जा.बोबलाद 1,येळवी 2,कुणीकोणूर 9,बिळूर 3,निगडी बु.1,को.बोबलाद 1,माडग्याळ 1,कोसारी 4,वायफळ 1,धावडवाडी 1,कासलिंगवाडी 3,गुळवंची 3,बेवनूर 2,खलाटी 3,कुडणूर 1,डफळापूर 3,अंकले 1,मिरवाड 1,बाज 1 असे 58 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज दिवसभरात 941 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील 23 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.आजचे कोरोना मुक्त 992 झाले आहेत.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9,055 वर पोहचली आहे.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1 लाख 28 हजार 379 वरआज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 15 हजार 630 नोंंद झाली आहे.म्युकर मायकोसिस :आजचे नवे रुग्ण 05,एकूण रुग्ण 238,एकूण मृत्यू 14
