जत : आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी यंत्रणेशी दोन हात करत जत तालुक्यात मोठा विकास निधी आणण्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी यश मिळविले आहे.जतचा सर्वागिंन विकासासाठी आ.सावंत यांना पुन्हा जतच्या जनतेने साथ द्यावी,आ.विक्रमसिंह सावंत यांच्या सारख्या नेतृत्वाला जतकरांनी जपायला तर हवेच, पण ते वाढवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करून जतवरचा दुष्काळ हा शब्द पुसण्याची धमक त्यांच्यात असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
जत येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अभीष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात आ.पाटील बोलत होते.
यावेळी आ.विक्रमसिंह सावंत, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, अथणीचे नेते चिदानंद सवदी, जितेश कदम, शिवाजीराव काळुंगे,सुजयनाना शिंदे, सरदार पाटील,अँड युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, बाबासाहेब कोडग यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आ.सतेज पाटील म्हणाले, जत तालुका हा खूप भाग्यवान आहे. कारण आपण २०१९ च्या निवडणुकीत विक्रमसिंह सावंत यांच्यासारखा तरूण आणि जनतेशी बांधिलकी असणारा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून विधीमंडळात पाठवला.विधीमंडळात आम्ही त्यांचे काम जवळून पाहात आहोत.पायाला भिंगरी लावून त्यांचे काम सुरू असते. सतत पाणी, विकासाचे प्रश्न घेवून ते प्रत्येक मंत्री, अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक अधिवेशनात ते पोटतिडकीने जतचे प्रश्न मांडून अधिकचा विकासनिधी पदरात पाडून घेत आहेत.
पाण्यासाठी तर ते महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांशी समन्वय ठेवत कसरतीची कामगिरी देखील पार पाडत आहेत.मुळात आ.सावंत हे स्व. पतंगराव कदम यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ. विक्रमसिंह सावंत यांना जनतेने साथ द्यावी.त्याबरोबर मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या विचाराचा विकासाचा वारसा पुढे नेहत असलेले तरूण नेते विशाल पाटील यांना लोकसभेला सर्वाधिक मतदान जतमधून मिळायला हवे. कारण कदमसाहेब व वसंतदादांची मोठी पुण्याई आणि विकासाचा वारसा असणारा हा जिल्हा आहे,असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
विशाल पाटील म्हणाले, आज जिल्ह्यात आ.विश्वजीत कदम, आ.विक्रमसिंह सावंत यांच्यासह आम्ही सारेच एकजुटीने विकासात्मक कामे करत आहोत. विक्रमदादांनी तर विस्तारीत आणि म्हैसाळ योजनेसाठी जी कणखर भूमिका घेवून काम केले. त्यामुळे आता या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी पंतप्रधानांना पुढे करावे लागत आहे.सांगलीचे खासदार गायब आहेत, त्यांनी काहीएक उठावदार काम केले नाही मागे प्रतीकदादांनी जतसाठी एक हजार कोटी आणले.त्यातून ही कामे झाली आहेत.शिवाय सांगली जिल्ह्यात बदलाचे वारे असल्याने आता खुद्द पंतप्रधनांनाच इथली धास्ती लागल्याचे पाटील म्हणाले.
अथणीचे काँग्रेस नेते चिदानंद सवदी म्हणाले,आ.विक्रमसिंह सावंत यांचे काम मोठ आहे.मागे आम्ही त्यांच्या विरोधात प्रचारात होतो.पण यावेळी जत मतदारसंघाच्या चारही दिशेला काँग्रेसची सता आणली आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दादांचा विजय सोपा असणार आहे. प्रचाराला तर येवूच,पण विजयी सभेला देखील आपण असू हा सीमावर्ती भाग स्नेहपूर्ण वातावरणाचा आहे.या मेळाव्यात बोलताना आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले, २० वर्षांपासून जतच्या प्रश्नासाठी संघर्ष करत आहे.तालुक्याने गेल्या पाच वर्षात विधीमंडळात कामाची संधी दिली.त्यांच्या विश्वासाला कुठेही डाग लावला नाही. म्हैसाळ योजना पूर्ण करून घेतली.विस्तारीत योजनेची मंजूर करून कामे सुरू झाली. शेती, शेतकरी यासह सरकार कुठलेही असले तरी अधिकचा निधी आणू शकलो.विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडता आली. यापुढेही हे काम अविरत चालू राहील. आपले आशीर्वाद यापुढेही आमच्या काँग्रेस पक्षावर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.वरिष्ठ स्तरावरून अजितदादा पवार, आ. जयंतराव पाटील, आ.बाळासाहेब थोरात, आ. नाना पटोले, आ.पृथ्वीराजबाबा चव्हाण, आ.अशोक चव्हाण,आ. विश्वजीत कदम, आ.मानसिंग नाईक,मंत्री सुरेशभाऊ खाडे, खा. संजयकाका पाटील, आ.सुमनताई पाटील, विजयमाला ताई कदम, आ. मोहनशेठ कदम, आ.अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध गावचे सरपंच पदाधिकारी, काँग्रेस कमीटीचे कार्यकर्ते आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
एक कर्तबगार आणि विकासात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व
जतच्या सर्वांगीण विकासासाठी मा. विक्रमसिंह सावंत घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे. म्हैसाळ,म्हैसाळ विस्तारित तुबची बबलेश्वर पाणी योजनांच्या माध्यमातून त्यांनी जतचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. जत विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेली विकासकामे त्यांच्या विकासात्मक दृष्टीची आणि कार्यकर्तृत्वाचीच प्रचिती देतात. तब्बल १५ वर्षाची जतमधील भाजपच्या विजयाची परंपरा खंडित करीत त्यांनी तालुक्यात काँग्रेसचा झेंडा तालुक्यात बुलंद केला. सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण केले. त्यांच्या रूपाने जतला एक कर्तबगार आणि विकासात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुका प्रगतीचे सर्व मापदंड पार करेल,असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.
जतचे ऑयडॉल नेतृत्व
दोन तपाहून अधिक काळ अनेक सेवाभावी उपक्रमातून आमदार सांवत यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रवेश केला.शहराबरोबर त्यांनी तालुक्यात,जनतेसाठी विविध उपक्रम राबवले.युवकांची ताकद समाजाच्या विकासात आणली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कॉग्रेसचे सर्वात मोठं संघटन तयार केलं.त्यांची परिचिती वाढदिनी आली.रवीवारी पुर्ण दिवस भरगच्च कार्य क्र मां ना नागरिकांची तूफान उपस्थिती,शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील मान्यवर,कार्यकर्ते,नागरिकांच् या रात्री उशिरापर्यत रांग लागली होती.आमदार सांवत नावचं ऑयडॉल नेतृत्व आता सर्वमान्य झालं आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंत्री सतेज पाटील,विशाल पाटील,अथणीचे नेते चिदानंद सवदी, जितेश कदम, शिवाजीराव काळुंगे आदी