आ.सावंत वाढदिनी आयोजित उद्योजकता मेळाव्यात ४८६ जणांना नियुक्ती पत्रे

0
जत : जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य परिसरात जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका व परिसरातील बेरोजगार तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य नोकरी व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास राज्यातील नामवंत ४० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. एकूण ९६४ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केलेली
होती.यापैकी ४८६ उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी कोल्हापूर मल्लिकार्जुन
माने तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त (महसूल) पुणेचे रामचंद्र शिंदे यासह प्रमुख पाहुणे म्हणून जत विभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्व विजय नोकरी व उद्योजकता मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक विक्रम फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र माने यांनी केले.सूत्रसंचालन भारत मुडे यांनी तर आभार दिनेश जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विक्रम फाउंडेशनचे नोकरी व उद्योजकता मेळाव्यात नियुक्तीपत्राचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर व डॉ. जितेश कदम उपस्थितअध्यक्ष युवराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती सुजय शिंदे, उद्योजक विनोद सावंत,निलेश बामणे, रामपूरचे सरपंच मारुती पवार, परवेझ गडीकर, सलीमपाच्छापूरे, अतुल मोरे, राजेंद्र जेऊर,यश सावंत, प्रदीप नागने, विशाल कांबळे, सौरभ कांबळे, सचिन कलाल यासह राजे रामराव महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.