राज्य सरकारकडून दुष्काळाची फक्त घोषणाच प्रत्यक्षात जत तालुक्यात कृती काहीच नाही.
जत तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने उलटत आले तरी प्रत्यक्षात जनावरांच्या साठी चारा छावणी व जनावरांच्या पाण्याची सोय कुठेच करताना प्रशासन दिसत नाही. जत तालुक्यात अजूनही 50 ते 60 गावात टँकरने पाणीपुरवठा चालू आहे.जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहे.प्रशासनाकडून चारा छावण्या व जनावरांना पाण्याची सोय करणे गरजेचे असतानाही कुठेही हालचाल दिसत नाही.सर्व सरकारी प्रशासन यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे.त्यामुळे जत तालुक्याच्या मूळ मुद्द्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.प्रशासनाने दुष्काळाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी व ज्या गावात जनावरांच्या साठी चारा छावणी व पाण्याची सोय करणे गरजेचे आहे असे सर्वे करून मागील आहे त्या छावणीवर जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय त्वरित करण्यात यावी.
अनेक ठिकाणी जलजीवन योजनेचे कामे सर्वे करून थांबलेले आहे. पुढे काही प्रशासनाचे हालचाल नाही. जलजीवनची कामे त्वरित लवकरात लवकर करून तालुक्यातील 29 गावांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. म्हैशाळ योजनेतील पाणी ज्या तलावात सोडायचे आहेत त्या तलावात सोडून परत त्या तलावातून पाणी उपसा करून जलजीवन योजनेच्या पाईपलाईनने पाणी ज्या त्या 29 गावांना सोडायचं आहे त्या ठिकाणी पुरवठा करता येईल अजून जलजीवन योजनेचे पाईपलाईनचे काम सुरू करायचे प्रतीक्षेत आहे. ती कामेताबडतोब सुरू करावेजलजीवन योजनेचे काम 100 पूर्ण करून त्या 29 गावांना पाणीपुरवठा करावा.प्रशासनावरील टँकरने पाणीपुरवठा करण्याचा लोड-भार कमी होईल.जत तालुक्यात पूर्व भागातील 29 गावचा पाणी प्रश्न जलजीवन योजनेच्या अपुर्ण कामामुळे कामे थांबलेला आहेतआहेत. प्रशासनाने त्यास गती देऊन कामे लवकरात लवकर सुरू करावेत.व दुष्काळाची गंभीर परिस्थितीची दखल घेऊन त्वरित कामे मार्गी लावावीत,अशी मागणी सरपंच भगवानदास केंगार यांनी केली आहे.