जत,संकेत टाइम्स : उमदी येथील जगद्गुरु श्री मोनेश्र्वर वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षी आषाढ महिन्यात उमदी ते पंढरपूर पायी वारी करतात,या वारीमध्ये आम्हीही मोठ्या संख्येने सहभागी होवू आणि विठ्ठलाची दर्शन घेवून आशीर्वाद घेवू असे मत,जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी व्यक्त केले
उमदी येथील जगद्गुरु श्री मोनेश्वर वारकरी संप्रदायाच्या वतीने आषाढ महिन्यात उमदी ते पंढरपूर पायी वारीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्यामुळे रवी पाटील यांनी स्वतःहून पायी दिंडीत सहभागी होण्याचे तयारी दर्शविल्याने वारकरी मंडळींमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे.
जगद्गुरु श्री मोनेश्वर वारकरी मंडळाच्या वतीने पायी दिंडीचा तिसरा वर्षे असून यावेळीही मोठ्या संख्येने वारीत सहभागी होण्याचे मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.वयस्कर मंडळीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने जेष्ठ मंडळींनी या पायीदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे.ज्यांना या आनंद पायी दिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी उमदी येथील जगद्गुरु श्री मोनेश्वर मठात नाव नोंद करण्याचे आवाहन केले आहे.