माडग्याळ,संकेत टाइम्स : म्हैसाळ योजनेतून माडग्याळ व परिसराला पाणी देणेसाठी लोकवर्गणीतून कॅनॉल काढणार असल्याची माहिती,रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.जमदाडे म्हणाले,जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेतून 15 दिवसांपूर्वी उमदीपर्यंत पाणी गेले आहे.ते माडग्याळ गावाच्या शिवेवरून पाणी जात आहे,परंतु माडग्याळ गावाला याचा काहीही उपयोग झालेला नाही.
माडग्याळ मायथळ रस्त्यालगत गेट काढून 200 मी लांबी व साधारणपणे सरासरी 15 ते 20 फूट खोल खुदाई केल्यास माडग्याळ भागातील 60 टक्के भाग ओलिताखाली येणार आहे,त्याच ओढ्यातून सोन्याळ उटगी पुढे दोड्डानाला तलावाला पाणी जाते,यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, म्हणून रविवारी जमदाडे,बाजार समिती माजी संचालक विठ्ठल निकम,माजी पं.स.सदस्य सोमण्णा हाक्के,परशुराम बंडगर,सुरेश हाक्के,रावसाहेब जत्ती व पांडुरंग सावंत आदींनी खा.संजयकाका पाटील यांची भेट घेतली होती.
तात्काळ खा.पाटील यांनी कार्यकारी अभियंता श्री.पाटील व उपअभियंता अभिमन्यू मासाळ यांना 2019 मध्ये मी स्वतः श्री.गुणाले यांना घेऊन पाहणी केली आहे,आपण सदर ठिकाणी पाहणी करून स्वंतत्र गेट बसवून द्यावे.त्यापुढील खुदाई ही लोकवर्गणीतून आम्ही करू असे सांगितले.त्यासाठी आज सोमवारी शाखा अभियंता अभिमन्यू मासाळ,श्री.पुरोहित आणि श्री.दळवी यांनी सदर ठिकाणची स्वतःपाहणी केली.
माडग्याळ आणि परिसराला पाणी देणेसाठी योग्य ठिकाणी गेट बसविण्यासाठी लवकरात लवकर अहवाल पाठवून काम पूर्ण करून देऊ अशी ग्वाही अधिकाऱ्यांना दिली.त्यामुळे माडग्याळ परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान माडग्याळ येथे श्री.जमदाडे सह माडग्याळ मधिल लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
माडग्याळ ता.जत येथे म्हैसाळच्या कँनॉलमधून गेट बसविण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली.










