माजी आमदार सनमडीकर काकांचे तालुक्याच्या विकासात मोठे योगदान | आ.विक्रमसिंह सावंत : जयंतीनिमित्त अभिवादन

0
7
जत : काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार श्री.उमाजीराव सनमडीकर (काका) यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त कमल ऑर्थोपेडीक सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.यावेळी काकांचा सामाजिक,शैक्षणिक कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि डॉ.वैशाली सनमडीकर यांनी काकांच्या 86 व्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील गरीब व गरजू लोकांना आपल्या वैद्यकीय सेवाचा लाभ देता येईल याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.या शिबिराचे उद्घाटन दिवंगत माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या पत्नी श्रीमती कमल सनमडीकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत प्रमुख उपस्थित उपस्थित होते.डॉ.कैलास सनमडीकर,डॉ.वैशाली सनमडीकर,विजय सनमडीकर,नाना शिंदे,बाबासाहेब कोडग, तमन्नागौडा रवीपाटील,संजय कांबळे, मिथाली खांडेकर,यल्लाप्पा चिगदुळे,दिनकर पतंगे,शहाजी घाडगे,दामाजी पवार,डॉ.के.नागेंद्र प्रसाद,डॉ.रवी जानकर,डॉ.ऋषिकेश कोरे,डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी,डॉ.सोमशेखर मोदी,डॉ.सुबोध गुरव,डॉ.निखिल बिज्जरगी,सर्व आजी व माजी सैनिक,तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

त्यांचप्रमाणे सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ,सनमडी आणि श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत या दोन्ही संस्थेचे चेअरमन,संचालक, प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ,विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं तसेच जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.सर्वांनी काकांना आदरांजली वाहिली.मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा सुमारे दोनशेहुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला.यामध्ये रुग्णांना मोफत एक्स-रे आणि औषध उपचार करण्यात आले.माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे जत तालुक्याच्या विकासात मोठे योगदान असून कॉग्रेसला तळागाळात पोहचविण्याचे काम काकांनी केले आहे,असे यावेळी आ.विक्रमसिंह सांवत यांनी उद्गार काढले.
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here