जत : जत तालुक्यातलं म्हैसाळचं आवर्तन अद्याप पाणी शेवटपर्यंत पोहोचण्याआधीच बंद केलं गेलं आहे ते लवकर सुरु करणे गरजेचे आहे,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत केली.
आ.सावंत म्हणाले, जुलै-ऑगस्ट मध्ये पावसाळ्यात वाहून जाणारे पुराचे पाणी म्हैसाळ योजनेद्वारे जतला द्यावे जेणेकरून सर्व तलाव भरून घेता येईल व उन्हाळ्यात भूगर्भातील पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होईल. म्हैसाळ योजनेकरिता भूसंपादन व भुईभाडे हा विषय प्रलंबित असून त्याचा त्वरित निपटारा करावा अशी मागणी याप्रसंगी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीस उपस्थित राहून पालकमंत्र्यांच्या समोर विविध प्रश्न मांडले. जत तालुका जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा मोठा तालुका आहे मात्र विकासकामासाठी आवश्यक निधी दरवेळी कमी दिला जातो हे कुठेतरी थांबले पाहिजे,अशीही भूमिका आ.सावंत यांनी मांडली.