कुडणूर-शिंगणापूर रस्त्यावरील काटेरी झुडपे काढा ; अभिजीत चव्हाण

0
13



डफळापूर, संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील कुडणूर-शिंगणापूर अनेक दिवासानंतर झालेला डांबरीकरणाचा रस्ता काटेरी झुडपाने गायब झाला,असून संबधित विभागाचे तातडीने या मार्गा कडेची झुडपे काढावीत,अशी मागणी बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांनी केली आहे.






कुडणूर ते शिंगणापूरला जोडणारा हा चार-पाच किलोमीटरचा रस्ता अनेक दिवासानंतर डांबरीकरणाचा झाला आहे. मात्र काही दिवसातच रस्त्याकडेच्या काटेरी झुडपे मोठी झाल्याने त्यात रस्ता पुर्णत: झाकोळलला आहे.एका वेळी एक चारचाकी वाहनही जाऊ शकत नाही,इतकी झुडपे रस्त्यावर आली आहेत.त्यामुळे दुचाकीसह वाहनधारकांना धोका वाढला आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ही झुडपे काढून रस्ता‌ मोकळा करावा,असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here