जत नगरपरिषदेत आ.सावंत यांनी घेतला विकासकामांचा आढावा

0
15
जत : जत नगरपरिषदेच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी, तसेच मतदारसंघातील आवश्यक कामांच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी, जत येथे नरपरिषद आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी संपूर्ण कामाची माहिती घेतली. तसेच या पुढे मतदारसंघात आवश्यक असलेल्या कामाबद्दल मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी प्रांत.अजयकुमार नष्टे, नगरपरिषद मुख्याधिकारी कुंभार साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी काटकर साहेब उपस्थित होते.शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देऊन विकासकामांना महत्व द्यावे,कामे गतीने करावीत.नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचणी आल्या नाही पाहिजेत,अशा सक्त सुचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी प्रभाग निहान विकासकामे,निधिची उपलब्धता, कामातील गती यांचीही सावंत यांनी माहिती घेतली.
जत नगरपरिषदेत विकासकामांचा आढावा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घेतला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here