जत : जत तालुक्यातील शाळांच्या भौतिक आणि गुणवत्तेच्या बाबतीत प्रशासनाची उदासीनता आहे. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही.तातडीने रिक्त जागेवर शिक्षकांची नियुक्ती करा, शिक्षण विभागाच्या इतरही समस्या सोडवा, कामात सुधारणा करा, मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.जिल्हा परिषदेमध्ये आमदार सावंत आणि आमदार जयंत आसगावकर यांनी गुरुवारी शिक्षण व बांधकाम विभागाची अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.
त्यावेळी त्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. त्यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे उपस्थित होत्या. गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत नाही. झेडपीच्या शाळांतील पटसंख्या का कमी होत आहे? याला जबाबदार कोण? परिस्थिती अशीच राहिली, तर एक दिवस जत तालुक्यातील शाळा बंद पडतील, अशी भीती आहे. तसे झाल्यास त्याला शिक्षण विभाग जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी जिल्हा परिषदेतून
अधिकाऱ्यांना दिला. निर्लेखनाचे प्रस्ताव प्रलंबित
गेल्या अनेक महिन्यांपासून जत तालुक्यातील काही शाळांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव धूळ खात पडून आहे. त्यामध्ये गांभीयनि लक्ष घाला, तातडीने प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना त्रास : आ. सावंत
काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे. तशा तक्रारी काही शिक्षकांनी दिल्या आहेत. तक्रार करणाऱ्या शिक्षकांना त्रास देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र हे खपवून घेणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला.
सांगली येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विविध विषयांवर चर्चा करून त्याचा आढावा घेतला.
ho
कोट केलेला मजकूर दर्शवा