जत : भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख तम्मणगौडा रवीपाटील यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेचा तीसरा टप्पा २९ ऑगष्टपासून सुरू होत आहे.जत उत्तर भागातील गावातून ही पदयात्रा सलग तिनदिवस जाणार आहे.
यात २९ ऑगष्टला शेगाव,बनाळी,निगडी खुर्द,काराजनगी,कोळगिरी,३० ऑगष्टला सोरडी गुड्डापूर,व्हसपेठ,माडग्याळ ३१ ऑगष्टला सोन्याळ,जाडर बोबलाद,उटगी अशा गावातून पदयात्रा जाणार आहे.
तालुक्यात पदयात्री म्हणून नावलौकिक मिळविलेले तम्मणगौडा रवीपाटील यांनी प्रत्येक गावात पुरूष मंडळीसह महिला,माता भगीनीचा मोठा प्रतिसाद लाभ आहे.जत विधासभेचे भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार असलेले तम्मणगौडा रवीपाटील यांनी भाजपाच्या जनकल्याण योजना या निमित्ताने घराघरात पोहचविल्या आहे.