कानाखाली वाजवल्याचा राग, सांगलीत तरूणाचा कोयत्याने वार करून निर्घण खून | संशयित ५ अल्पवयीन ताब्यात

0
19
सांगली : जून्या ‌वादातून तरूणाचा कोयत्याने वार करून निर्घण खून झाल्याचे धक्कादायक सांगली शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ घडली आहे.दरम्यान पोलीसांनी तातडीने ‌यंत्रणा हलवत ५ अल्पवयीन मुलांना ‌ताब्यात घेतले आहे.प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेतचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत.
हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाचजणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक जाधव, सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतिश शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

 

अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २२, रा. जामवाडी, सांगली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्याने एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग त्या मुलांना होता.मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुले तेथे आली.
त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला.
त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला.त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले.त्यातील वार वर्मी बसल्याने अनिकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला.पोलीस पथकांनी केलेल्या चौकशीत हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here