नवी दिल्ली: सध्या तरुणांमध्ये वृद्धांमध्ये विसरभोळेपणासाठी कारणीभूत ठरणारा व्हॅस्कूलर आणि अल्झायमर डिमेंशिया आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण उपचारांसाठी डॉक्टरांकडे येत आहेत.
डॉक्टरांच्या मते, सतत ताण घेणे आणि एकाचवेळी अनेक कामे एकाचवेळी करणे (मल्टीटास्किंग) यामुळे तरुणाईमध्ये विस्मरणाचा आजार वाढला आहे. खराब अन्न, टेन्शन आणि अधिक वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर राहिल्याने मेंदूच्या नसांवर ताण वाढत आहे. त्यामुळे कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे.
तुमच्यामध्ये आहेत का ही लक्षणे ?
■ काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, पण तिथे गेल्यावर काय घ्यायचे तेच विसरतो.
■ परीक्षेच्या तयारीसाठी खूप मेहनत घेत अभ्यास केला, मात्र पेपरमध्ये उत्तर लिहिताना अर्धी उत्तरे विसरलो.
■ कधी कोणी खूप दिवसानंतर भेटला तर त्याचे नावच आठवत नाहीत.
एका खोलीतून उठून दुसऱ्या खोलीत काही कामासाठी गेलो, पण तिथे पोहोचल्यावर कोणत्या कामासाठी आलो हेच विसरलो.
खराब जीवनशैलीमुळे तरुण तणावाखाली आहेत. ३५-४० व्या वर्षी ते वृद्धापकाळाच्या आजाराने त्रस्त आहेत. मेंदूला विश्रांती न दिल्यास मेंदूच्या नसांमध्ये अमॉडलाइड प्रोटीन जमा होते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते.
– डॉ. एम. सुकुमार, तज्ज्ञ