लाखो लोंकानी दिला आशीर्वाद | तम्मणगौडा रवीपाटील यांच्या जनकल्याण संवाद यात्रेची सांगता

0
6
तम्मणगौडा रवीपाटील झाले पदयात्री,लाखो लोंकानी दिला पाठिंबा
भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व जनकल्याण संवाद पदयात्रेचे प्रणेते तम्मण्णगौड्डा रविपाटील यांची जनकल्याण संवादयात्रा माडग्याळ येथे दाखल होताच माडग्याळकरांनी अत्यंत उस्फूर्तपणे या यात्रेचे मोठ्या बाटामाटात वाजत गाजत स्वागत केले. तम्मण्णगौड्डा रविपाटील यांच्या जनकल्याण संवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून आज माडग्याळ व व्होसपेठ येथे यात्रेचे आगमन झाले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.
यात्रेचे माडग्याळ येथे आगमन होताच युवा नेते कामाण्णा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली तम्मण्णगौड्डा रविपाटील यांच्यावर फुलांची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी माडग्याळ येथे जाहीर सभा संपन्न झाली. बसवराज पाटील एंकुडीकर म्हणाले की, आशा प्रकारची पदयात्रा आज पर्यंत कोणत्याही नेत्याने काढली नाही यात्रेत प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून  बोलताना म्हणाले की, भाजपाने केंद्रात आणि राज्यात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडतानाच या पदयात्रेत ते जतकरांच्या समस्या जाणून घेत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे.

त्यामुळे सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध जनकल्याण योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही गावोगावी यात्रेच्या निमित्ताने फिरत आहोत. नारी शक्तीचा सन्मान म्हणून आम्ही यात्रेच्या दरम्यान सर्व गावात महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन महिलांना सन्मानित करत आहोत. माडग्याळकरांचे माझ्यावरती विशेष प्रेम आहे. त्यांनी मरघोस अशा दिलेल्या मतदानावरच मी जिल्हा परिषदेचा सभापती झालो होतो.

त्यामुळे मी माडग्याळकरांचे उपकार त्या सोडवण्याचा प्रमाणीक प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गेल्या पस्तीस वर्षात आशा प्रकारची जनकल्याण यात्रा निघालेली आयुष्यभर विसरणार नाही. उपकाराची परतफेड म्हणूनच मी माडग्याळ येथील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी ४० लाख रुपयाचा निधी शासनाकडून मिळवून दिलेला आहे.
भविष्यात माडग्याळ येथील सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी मोठ्या उद्योगधंद्याची उभारणी करणार आहे. माडग्याळ येथल सुशिक्षित महिलांनी बचत गटाच्या महिलांनी पुढे येऊन मोठ्या उद्योग व्यवसायासाठी तयारी करावी त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत व केंद्र शासनाचे अनुदान मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अशा प्रकारचा मोठा उद्योग या परिसरात निर्माण झाल्यास महिलांच्या हाताला काम मिळवून महिलांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी सुनील पोतदार, माडग्याळचे लोकनियुक्त सरपंच आनीता माळी, निर्मल कोरे, संगीत माळी, विठ्ठल निकम, कामाण्णा बंडगर, शिवानंद हाक्के, निवृत्ती शिंदे, विवेक कोकरे, महादेव माळी, विजयकुमार बंगली, लिंबाजी माळी यांच्यासह माडग्याळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here