तिरोडा तालुक्यातील एका काष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनीच्या मोबाइलवर अश्लील फोटो व मॅसेज पाठवून शिक्षकाने विनयभंग केला. २२ ऑगस्टला मुलीच्या मोबाइलवर आलेल्या मॅसेजवरून हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंद केला. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
शिक्षक उमेश मेश्राम याने मुलीची छेड काढली व तिच्या मोबाइलवर फोटो पाठविले. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून शिक्षकाला रात्री ९ वाजता अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने भंडारा कारागृहात रवाना करण्यात आले. तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी शिक्षकाला तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.
त्या’ दोन शिक्षकांची कारागृहात रवानगी
वरोरा (जि. चंद्रपूर): अल्पवयीन मुलीला वाढदिवसानिमित्त रूमवर बोलावून विनयभंग केल्याने पोलिसांनी दोन शिक्षकांना अटक केली. त्यांना शनिवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी वरोरामध्ये बंद पाळण्यात आला.
आश्रमशाळेतील शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आश्रमशाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी संशयितास पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर शिक्षकास अटक करण्यात आली आहे.