जत : जत तालुक्यातील सर्व शिक्षकांना बीएलओंच्या कामातून मुक्त करण्यात यावे, यासाठी शिक्षक भारतीतर्फे मागणी करण्यात आली. अध्यक्ष दिगंबर सावंत, माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, बाळासाहेब जायभाये, रतन कुंभार, सुरेश संकपाळ, तानाजी पवार, तानाजी सावंत, अनिल सावंत यांनी जतचे तहसीलदार बाळासाहेब सवदे यांना निवेदन दिले.
२३ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांनी करावयाची शैक्षणिक व अशैक्षणिक कामे, कोणती कामे करायची याची यादी दिलेली आहे. यामध्ये शिक्षकांनी अन्य कोणतीही निवडणुकीबाबतची कामे करायची
नाहीत, असे म्हटले आहे. बीएलओच काम निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे बीएलओच्या कामातून शिक्षकांना मुक्त करावे. हे काम अशैक्षणिक स्वरूपाचे आहे. बीएलओ निरंतर चालणारे काम असल्यामुळे ते अशैक्षणिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे ते शिक्षकांना यापुढे देण्यात येऊ नये फक्त शिकवण्याचे काम शिक्षकाच आहे, तेच त्याला करू द्यावे, अर्थ मागणी शिक्षक भारतीच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी सुमित लेडांगे, तुषार गुरव नितीन पवार, मिनेश्वर राऊत, संजय सोलनकर, नवनाथ लहांगे, तानार्ज सावंत, चंद्रकांत ऐवळे, विलास चौगुले अजय डोंगरे, विठ्ठल जायभाय शशिकांत चौधरी, आदी उपस्थित होते




