सांगलीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली

0
10

सांगली : घरगुती भांडणानंतर उपनगरातील एक मुलगी शनिवारी सकाळी घरातून निघून गेली. नातेवाइकांनी शोध सुरू केला. संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तोपर्यंत रेल्वेतून गुजरातच्या सीमेवर पोहोचली. पोलिस तपासावेळी मुलगी गुजरात येथे असल्याचे समजले. रेल्वेच्या आरपीएफ जवानांच्या मदतीने तिला वापी स्थानकात थांबवून ठेवले. त्यानंतर पालकांना तत्काळ तिथे पाठवले. त्यांनी रविवारी तिकडे रवाना होत मुलीला सुखरूपपणे ताब्यात घेतले.उपनगरातील १७ वर्षांची मुलगी शनिवारी सकाळी घरगुती भांडणातून घराबाहेर पडली. कोणास न सांगता तिने रेल्वेस्थानक गाठले.

 

तेथून ती अजमेरला जाणाऱ्या रेल्वेत बसली. इकडे मुलगी न सापडल्यामुळे पालकांनी संजयनगर पोलिसात तक्रार दिली. एका प्रवाशाने रेल्वेच्या आरपीएफ जवानांना हा प्रकार कळवला. जवानांनी मुलीला सुखरूपपणे वापी स्थानकावर उतरवले. त्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक बयाजीराव यांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने पालकांना तिकडे पाठवले. पालकांनी रविवारी वापी येथे जाऊन मुलीला सुखरूपपणे ताब्यात घेतले.

प्रवाशाची सतर्कता

सांगली स्थानकावरुन रेल्वेतून निघालेली मुलगी गुजरातच्या सीमेजवळ पोहोचली. रेल्वेत ती रडत असल्याचे पाहून एका प्रवाशाने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने घरातील भांडणानंतर बाहेर पडल्याचे रडत-रडत सांगितले. त्याने आरपीएफला माहिती दिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here