अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग; मोबाइलमध्ये शूट

0
15
एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अतिप्रसंग करून मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी १३ वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील उर्फ दादू बेठेकर विरुद्ध बलात्कार, मारहाण व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी किराणा दुकानातून घरी परतजाताना आरोपीने तिचा पाठलाग केला. ‘चलती क्या मेरे साथ’ असे तो बरळला.

 

त्यावर तिने नकार दिला. मात्र त्याने तिच्याशी जबरदस्ती वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. पीडितेने विरोध केला असता आरोपीने कत्त्याने तिच्या डाव्या हाताचे बोटाला मारून जखमी केले. तथा घटनेची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करवून घेत तिने शेत गाठले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here