जत तालुक्यातील ‘या’ महाविद्यालयास नँकचा ‘अ’ दर्जा

0
21
3.02 गुणांकन मिळवणारे गुणवत्तापूर्ण महाविद्यालय म्हणून लौकिक
जत : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जत येथील राजे रामराव महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद अर्थात (नॅक) बेंगळुरू कार्यालयाच्या वतीने चौथ्या पुनर्मूल्यांकनासाठी ‘अ’दर्जा प्राप्त झाला असुन याचा अधिकृत ई-मेल महाविद्यालयास प्राप्त झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले की, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही भारतातील एक सरकारी स्वायत्त संस्था आहे, जी वरिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करून मान्यता देते. ही एक स्वायत्त संस्था असून दि. 25 व 26 जुलै 2024 रोजी नॅकच्या त्रिसदस्य समितीने महाविद्यालयास भेट दिली होती.

या समितीच्या प्रमुख म्हणून कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील सामाजिक शास्त्र अधिष्ठाता व समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रो.डॉ.जयश्री शिवनंदा, समनवयक म्हणून पश्चिम बंगाल येथील गौरबंगा विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे प्रो.डॉ.गौतम भौमिक तर सदस्या म्हणून हैदराबाद येथील राजा बहादुर व्यंकट राम रेड्डी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अच्युथादेवी जमुला उपस्थित होत्या.
   
समितीने दोन दिवस महाविद्यालयातील सहा विज्ञान प्रयोगशाळा, पंधरा अधिविभाग, ग्रंथालय, वाचन कक्ष, विद्यापीठ मान्यता संशोधन प्रयोगशाळा, उपहारगृह, मुलींचे दोन वसतीगृहे, विद्यार्थिनी विश्रामगृह, जिमखाना, बॅडमिंटन हाॅल, ॲथलेटिक्स मैदान, फुटबाॅल मैदान व डॉ.बापूजी साळुंखे भाषा प्रयोगशाळेना भेट दिली. याचबरोबर जैवविविधता संवर्धनासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतलेल्या वेगवेगळ्या प्रजातीच्या वनस्पती व तेरा बगीच्यांना भेट देऊन अहवाल तयार केला व तो बेंगलोर येथील कार्यालयास पाठवला.त्यानंतर आज कार्यालयाकडून हा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये महाविद्यालयास “अ” दर्जा प्राप्त झाला आहे.
       
महाविद्यालयाच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ.शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी,अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे,श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे,श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे,जतचे आमदार मा.विक्रमदादा सावंत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सुजय उर्फ नाना शिंदे, मा.बाबासाहेब कोडग, रामपूरचे सरपंच मा.मारुती पवार, मा.मोहन माने पाटील, ॲड.प्रभाकर जाधव, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर गोब्बी, खजिनदार अनिल मिसाळ, माजी प्राचार्य डॉ.शिवाजीराव बिसले,प्रा.चंद्रसेन मानेपाटील, प्रा.सिद्रामदादा चव्हाण, श्रीमंत ठोंबरे त्याचबरोबर जत व जत पंचकोशीतील आजी-माजी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील व अंतर्गत गुणवत्ता आम्ही कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ, सहसमन्वयक डॉ.रामदास बनसोडे याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.
राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच “अ” दर्जा प्राप्त झाला याचा आनंद आहे. महाविद्यालयावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भागधारकांचा मी आभारी आहे.दुष्काळग्रस्त व ग्रामीण भागात असूनही महाविद्यालयाने अनेक नवीन उपक्रमासह कृतिशील व प्रात्यक्षिक शिक्षणामुळे जत व जत पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला आहे.
– प्राचार्य डॉ.सुरेश पाटील
मागील पाच वर्षातील महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे व सर्वांगीण विकासामुळे आज हे यश प्राप्त झाले आहे.नॅकच्या तिसऱ्या पर्वात 2.30 सी.जी.पी.ए सह ब मानांकन होते. मात्र चौथ्या पर्वात त्यात वाढ होत 3.02 सह अ दर्जा प्राप्त झाल्याने महाविद्यालयाचा स्तर निश्चित उंचावेल.
– समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here