लाडकी बहीण’चा तिसरा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

0
7

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या २९ सप्टेंबर रोजी जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात, असेही तटकरे यांनी सांगितले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती.त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी दिली होती.

जॉइंट अकाऊंट चालणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here