पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अक्कळवाडी ते गिरगाव दरम्यानच्या फॉरेस्टमध्ये लिंबाच्या झाडाला एकतरसाब मुल्ला यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आली. अक्कळवाडीचे पोलीस पाटील भालचंद्र पाटील यांनी उमदी पोलीसात वर्दी दिल्यानंतर उमदी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा व मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.