माधवनगरला ग्रुप अँडमिनवर गुन्हा

0
234
Crime danger disgrace scandal shame breaking news newspaper urgent headline background.

सांगली: माधवनगर (ता. मिरज)येथील एका व्हॉटस् अँप ग्रुपवर भावना दुखावणारा मेसेज टाकल्याप्रकरणी ग्रुप अॅडमिन राजेश सीताराम आवटी- चव्हाण (रा. माधवनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सनोबर दाऊन खान (रा. सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

माधवनगर येथील काही कार्यकर्त्यांनी आपलं माधवनगर नावाने एक व्हॉटस् अॅप ग्रुप चालवला आहे. या ग्रुपवर राजेश आवटी याने दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास एक आक्षेपार्ह मेसेज फॉरवर्ड केला होता.

समाजाच्या भावना दुखावणारा हा मेसेज असल्यामुळे खान यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली. तसेच पोलिसांनी आवटी यांनी सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेला मेसेजचा स्क्रीन शॉट पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. राजेश आवटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलिस तपास करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here