जत : दरवर्षी वीजबिलात सातत्याने वाढ होत आहे. त्यात भरीस भर म्हणून वीजबिलात अनेक अनावश्यक कर लावण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना हकनाक आर्थिक भुर्दंड बसत आहे. राज्य शासनाने हे अनावश्यक कर रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.
महावितरण कंपनीकडून युनिट रिडींगपेक्षा अधिक कर लावण्यात आल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका ग्राहकांना बसत आहे. वीजबिलामध्ये स्थिर आकार, वीज कर आकार, इंधन समायोग आकार, विक्री आकार असे अनेक कर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह शेतकरी, घरगुती वीज वापर करणारे ग्राहक यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हे सर्व कर रद्द करण्यात यावेत व कमी दरात वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.