सांगली : येथील सामाजिक,सहकार व कर सल्लागार क्षेत्रात सांगली जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश विठ्ठल भोसले यांना ईगल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सामाजिक जिवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे.हा पुरस्कार रविवार दिनांक 8 रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे (कोल्हापूर) येथे मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
दुष्काळी जत तालुक्यातील डफळापूर येथून सांगली ही आपली कर्मभूमी समजून सतीश भोसले यांनी ग्रामीण भागातील अनेक सहकारी संस्था या कशा चालवाव्यात, संस्थांचे व्यवस्थापन कसे असावे, सहकारी संस्थांचे ऑडिट सहकार संस्थांचे कागदपत्र व त्यांचे कार्य कसे असावे हे जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे कार्य पाहून त्यांची सांगली जिल्हा ऑडिटर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तसेच महाराष्ट्र राज्य ऑडिटर महासंघाचे सचिव पदी व पब्लिक ट्रस्ट ऑडिटर असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षापासून ते काम करत आहेत.
तर कर सल्लागार म्हणून गेले वीस वर्ष सहकार क्षेत्रात सांगली येथे कार्यरत आहेत.सतीश भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रभर कार्य असणाऱ्या ईगल फाउंडेशनने व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांना मानाचा जीवन गौरव पुरस्कार घोषित करून तो रविवारी संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे देण्यात येणार आहे. त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कृत जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रमासाठी माजी खा.निवेदिता माने
आमदार अशोकराव बापू माने,विनायक भोसले,डायरेक्ट संजय घोडावत युनिव्हर्सिटी शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे महाराज, सुभाष घुले, उपायुक्त पणन, एन.सी.संघवी उद्योजक,प्रा.अरुण घोडके ,प्रख्यात इतिहास अभ्यासक,डॉ.शंकर अंदानी,श्री प्रविण काकडे उपस्थित राहणार आहेत.शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे महाराज यांचे आयुष्याचे संतुलन या विषयावरील अत्यंत प्रेरक व्याख्यान होणार आहे.अशी माहिती ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर,प्रा. सागर पाटील,प्रा.प्रकाश वंजोळे, शेखर सूर्यवंशी यांनी दिली आहे.