जतमध्ये पीएनजीचे सोने, हिरे, दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीस आजपासून प्रारंभ | पुढील दोन दिवस सुरू राहणार प्रदर्शन

0
147

दागिने खरेदीवर सोन्याची नाणी भेट तर हिऱ्याच्या दागिने घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट

जत : सांगली येथील प्रख्यात पेढी मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीने जत येथे शिवानुभाव सभामंडप हॉलमध्ये सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केले आहे. हे प्रदर्शन आज दिनांक ९ ते ११ फेब्रुवारी २०२५ अखेर सकाळी १० ते ८ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती संचालकांनी दिली.

मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीची स्थापना १८३२ साली सांगलीतील सराफ कट्टा येथे झाली. पेढीला १९२ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. पीएनजीने स्थापनेपासून विश्वासार्हता सचोटीचे व्यवहार आणि ग्राहकाभिमुख दृष्टीकोन जपला आहे. त्याच्या बळावरच पेढीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. पीएनजीच्या महाराष्ट्रात सराफ कट्टा सांगली, विश्रामबाग, मिरज, व्हीनस कॉर्नर-कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, रत्नागिरी आणि चिपळूण येथे शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर पेढीच्या कर्नाटकामध्ये बेळगाव, विजापूर आणि जमखंडी येथे शाखा आहेत. लवकरच कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथे पितळी गणपतीसमोर आणि कर्नाटकातील हुबळी येथेही शाखा सुरु होत आहे.

पीएनजीतर्फे उत्तमोत्तम, पारंपरिक,ट्रेंडी, एक्स्क्लुजिव्ह सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री जत येथे शिवानुभाव सभा मंडप हॉलमध्ये आयोजित केले आहे. यानिमित्ताने सोने आणि हिऱ्याच्या विस्तृत, नवनवीन, अप्रतिम, कलात्मक, पारंपरिक दागिने असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यासोबतच सध्या सिल्व्हर ज्वेलरीला देखील ग्राहकांची अधिक पसंती असल्याने ती देखील बघायला व खरेदी करायला मिळणार आहे.

या प्रदर्शनात सोने दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे, तसेच हिऱ्याच्या दागिने घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. ग्राहकांनी सर्व प्रकारचे दागिने पाहण्यासाठी, खरेदीसाठी आणि ऑफरची अधिक माहिती प्रदर्शनस्थळी मिळणार आहे. जतकरांनी प्रदर्शनाला आवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालकानी केले आहे.

महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम

दिनांक १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम जतमधील शिवानुभाव सभा मंडप हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत चांदीची बक्षिसे आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here