भरतीची सुवर्णसंधी | डफळापूर येथील ‘श्री बुवानंद अर्बन’कडून भरती जाहीर; शाखाधिकारी ते वसूली एजंट पदांसाठी अर्ज मागवले

0
1

जत तालुक्यातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बुवानंद अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., डफळापूर यांनी विविध उच्च व मध्यम स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अनुभवी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून स्थानिक पातळीवर ही एक मोठी रोजगार संधी मानली जात आहे.

या भरती अंतर्गत शाखाधिकारी, क्लार्क/लिपिक आणि वसूली एजंट अशा एकूण पाच पदांसाठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध आहे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटी स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आल्या असून उमेदवारांकडे किमान २ वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आपले अर्ज पोस्ट, कुरिअर, हँड डिलिव्हरी किंवा ई-मेलद्वारे सादर करावेत, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. अर्ज पाठविण्यासाठी shribuvanandcreditsociety@gmail.com हा ई-मेल आयडी देण्यात आला असून अधिक माहितीसाठी 9503191433 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक ९ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.स्थानिक तरुणांसाठी ही मोठी संधी असून पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here