३३८३ कोटींची संपत्ती असलेले आमदार एक दिवस बनले ‘भिकारी’| रस्त्यावर अनुभवली माणुसकी

0
0

मुंबई : घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह यांचा भिकाऱ्याच्या वेशातील व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आध्यात्मिक गुरु नम्रमुनी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक दिवस आपली ओळख लपवून भिकाऱ्याचे जीवन अनुभवले.

गचाळ वेशभूषा आणि मेकअप करून शाह यांनी घाटकोपर परिसरात नागरिकांकडे अन्न व मदतीची मागणी केली. काहींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर काहींनी मदतीचा हात पुढे केला. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने त्यांना समोसा दिला, तर एका नागरिकाने २० रुपये देत जेवण करून घेण्यास सांगितल्याचे शाह यांनी सांगितले.

“अहंकार दूर ठेवण्यासाठी आणि सामान्य माणसाचे जीवन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी हा प्रयोग केला. कोणतीही राजकीय किंवा सामाजिक ओळख न वापरता एक दिवस सामान्य भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगलो,” असे शाह यांनी सांगितले.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार शाह यांनी सुमारे २,१७८.९८ कोटी रुपयांची, तर त्यांच्या पत्नीने सुमारे १,१३६.५४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यामुळे त्यांची एकत्रित घोषित संपत्ती सुमारे ३,३१५ कोटी रुपये होती. बांधकाम क्षेत्राशी संबंधित शाह यांची मॅन कन्स्ट्रक्शन्स आणि मॅन डेव्हलपर्सशी संबंधित व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.

या एका दिवसाच्या अनुभवातून सामान्य नागरिकांकडून मिळणारी मदत, दुर्लक्ष आणि माणुसकी जवळून अनुभवण्याचा प्रयत्न केल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here