आरेवाडीत १८ ऑक्टोबरला धनगर समाजाचा दसरा मेळावा

0
1

आरेवाडी : कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा बन येथे रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पारंपरिक दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या मेळाव्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

धनगर समाजाच्या अस्मितेसह शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे पडळकर यांनी सांगितले. सामाजिक एकजूट, स्वाभिमान आणि विविध प्रश्नांवर विचारमंथन हे मेळाव्याचे प्रमुख मुद्दे असतील.

मेळाव्यासाठी समाजबांधव, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्यांनी पिवळा फेटा परिधान करून आणि भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीने मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

आरेवाडीतील या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे धनगर समाजासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मेळाव्याचा तपशील :

  • दिनांक : रविवार, १८ ऑक्टोबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ४ वाजता
  • स्थळ : श्री बिरोबा बन, आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here